Marathwada Art Culture and Film Foundation

Website

Marathwada Art Culture and Film Foundation The Marathwada Art Culture and Film Foundation is a not-for-profit organization dedicated to promoting and preserving Maharashtra's rich artistic heritage.

It plays a pivotal role in supporting artists and fostering cultural appreciation.

दोन दिवसीय विशेष शॉर्टफिल्म (लघुपट) फेस्टिव्हलचे आयोजनराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या सहा लघुपटांचे होणार प्रद...
29/08/2026

दोन दिवसीय विशेष शॉर्टफिल्म (लघुपट) फेस्टिव्हलचे आयोजन

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या सहा लघुपटांचे होणार प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर (दि. २८ ऑगस्ट):मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन आयोजित अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) अंतर्गत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या "AIFF Round the Year" उपक्रमाअंतर्गत दोन दिवसीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल (लघुपट महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स येथील व्ही. शांताराम प्रेक्षागृहात संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी ६.३० वाजता लघुपटांचे प्रदर्शन होईल. या विशेष महोत्सवामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. एम जी एम विद्यापीठाचे स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स व कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर व मीडिया यांचे विशेष सहकार्य या उपक्रमास मिळालेले आहे.

शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी एकूण तीन लघुपट सादर होणार आहे. सुरुवातीला सामान्य माणसाच्या आयुष्यातील सूक्ष्म भावविश्व आणि मानवी अनुभवांना संवेदनशीलपणे मांडणारा निशी दुगार यांचा ‘अनार दाना’ हा लघुपट दाखविण्यात येईल. सदर लघुपट बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये जनरेशन केप्लस या विभागात दाखविण्यात आला.

त्यानंतर संजीवनी कांबळे यांचा ‘डोंगर/पाणी’ हा लघुपट दाखविण्यात येईल. नात्यांमधील न बोललेले भाव, बदलत्या आयुष्याच्या वळणावर उभे राहिलेले निर्णय आणि ‘आपलेपणा’ची अंतर्मुख करणारी जाणीव या लघुपटातून संजीवनी कांबळे यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मांडली आहे.

त्यानंतर अक्षय प्रदीप इंगळे दिग्दर्शित ‘महाल्लेची शाळा’ या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. कोरोनाकाळात शिक्षणाची बदललेली पद्धत, डिजिटल माध्यमांशी जुळवून घेताना कुटुंबांसमोर उभी राहिलेली आव्हाने आणि मुलांच्या शिक्षणाची धडपड ‘महाल्लेची शाळा’ या माहितीपटातून अक्षय इंगळे यांनी अत्यंत सहज, निरीक्षणात्मक आणि मानवी दृष्टिकोनातून टिपली आहे. या तीनही कलाकृती वेगवेगळ्या विषयांतून आजच्या समाजाचे, माणसांचे आणि बदलत्या जीवनाचे संवेदनशील चित्र उभे करतात.

रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी एकूण तीन लघुपट सादर होणार आहे. सुरुवातीला अभिषेक लोकणार यांचा ‘जिजीविषा’ हा लघुपट दाखविण्यात येईल. आदिवासी कुटुंबाच्या जगण्यातील संघर्ष, आजारपणाशी लढताना निर्माण होणारी असहायता आणि प्रतिकूल परिस्थितीतही माणसाला जगण्याची प्रेरणा देणारी आशा यांचे प्रभावी चित्रण अभिषेक लोकणार यांनी ‘जिजीविषा’ या लघुपटात केले आहे. सत्यघटनेवर आधारित या लघुपटाने गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसह विविध राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.

यानंतर प्राची बजाणिया यांचा ‘उंब्रो’ हा गुजराती-हिंदी लघुपट दाखविण्यात येईल. ‘उंब्रो’ म्हणजे घराची उंबरठ्याची जागा. घराच्या उंबरठ्यावरून पुढे न जाणाऱ्या स्त्रियांची नव्हे, तर त्याच उंबरठ्याच्या आत स्वतःचे भावविश्व, मैत्री, स्वप्ने आणि जगण्याचा आनंद जपणाऱ्या स्त्रियांची कथा प्राची बजाणिया यांचा ‘उंब्रो’ सांगतो. गुजरातमधील ध्रांगध्रा येथील स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यातील साध्या वाटणाऱ्या क्षणांतून त्यांचे परस्परांचे बंध, जगण्याची उमेद आणि सूक्ष्म प्रतिकाराची ताकद हा लघुपट अत्यंत संवेदनशीलपणे समोर आणतो

यानंतर मिलन करंजिया यांचा ‘The Old Bull Knows, or Once Knew’ हा लघुपट दाखविण्यात येईल. एका वृद्ध बैलाच्या निरोपाची कथा सांगताना FTII (Film and Television Institute of India) निर्मित हा लघुपट एका संपूर्ण भटक्या समुदायाच्या लोप पावत चाललेल्या जीवनपद्धतीचे चित्र उभे करतो. शंकर या बैलाचा आपल्या मालकापासून होणारा शांत विरह आणि नंदीवाले समाजाच्या बदलत्या वास्तवातील विस्थापन यांची सांगड घालत चित्रपट परंपरा, माणूस-प्राणी नाते आणि बदलत्या काळाची अपरिहार्यता यांचा अंतर्मुख करणारा अनुभव देतो. या चित्रपटाला San Sebastián International Film Festivalमध्ये Special Mention तसेच MIFF 2026 मध्ये IDPA Best Student Film पुरस्कार मिळाला आहे.

लघुपटांच्या प्रदर्शनानंतर लघुपटांचे दिग्दर्शक उपस्थित प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे चित्रपटप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांना लघुपट निर्मितीची प्रक्रिया, विषयाची मांडणी आणि पडद्यामागील अनुभव जाणून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

प्रवेश विनामुल्य असून चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांनी या विशेष लघुपट फेस्टिव्हलला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

'जिगीषा नाट्य सहवास २०२६’ महोत्सवाला रसिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! ❤️   #जिगीषा_नाट्य_सहवास  #...
24/08/2026

'जिगीषा नाट्य सहवास २०२६’ महोत्सवाला रसिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! ❤️

#जिगीषा_नाट्य_सहवास #रंगभूमी #मराठी_नाटक #रंगकला

24/08/2026
‘जिगीषा नाट्यसहवास २०२६’च्या तिसऱ्या दिवसाची रंगतदार पर्वणी! 📅 रविवार, २३ ऑगस्ट २०२६🎙️ प्रकट मुलाखत – नाटककार प्रा. अजित...
23/08/2026

‘जिगीषा नाट्यसहवास २०२६’च्या तिसऱ्या दिवसाची रंगतदार पर्वणी!

📅 रविवार, २३ ऑगस्ट २०२६

🎙️ प्रकट मुलाखत – नाटककार प्रा. अजित दळवी
⏰ सकाळी ११ वा. | 📍 आयनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर
🎤 मुलाखतकार : मुस्तजीब खान | शिव कदम

💬 अभिवाचन – ‘उमगलेले गांधी’
⏰ दुपारी ४ वा. | 📍 आयनस्टाईन सभागृह
अभिवाचक : रोहिणी हत्तंगडी, दीपक राजाध्यक्ष, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा जोशी

🎭 नाटक – ‘बरड’
⏰ सायं. ७ वा. | 📍 रुक्मिणी नाट्यगृह
🎟️ प्रयोग देणगीमूल्य : ₹२०० / ₹१०० ( बुकिंग लिंक 'बायो'मध्ये)

कलेचा अनुभव घ्या, संवाद ऐका आणि विचारांना नवी दिशा द्या! ❤️

आजचा दिवस नाट्यरसिकांसाठी खास आहे… तुम्ही येताय ना?

लोककलेच्या तालावर सत्तेला सवाल, सत्याचा आवाज; ‘सवाल-जवाब’ला जिगीषात उत्स्फूर्त दाद’जिगीषा नाट्य सहवास २०२६’च्या दुसऱ्या ...
22/08/2026

लोककलेच्या तालावर सत्तेला सवाल, सत्याचा आवाज; ‘सवाल-जवाब’ला जिगीषात उत्स्फूर्त दाद’

जिगीषा नाट्य सहवास २०२६’च्या दुसऱ्या दिवशी ‘सवाल-जवाब’ या संगीत नाटकाने रुक्मिणी सभागृहात रंगत आणली आणि रसिकांची मनं जिंकली.

गिरीश दातार आणि अपूर्वा कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित या प्रयोगातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोककला आणि सत्ता-सत्य यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला.

नव्या दमाची शाहीर कलावतीबाई (सुकन्या गुरव) आणि मंत्र्याचा पीए (संकेत जोशी) यांच्यातील खटकेबाज संवादातून पुढे सरकणाऱ्या कथेला गण, गवळण, लावणी, कटाव, पोवाडा आणि शाहिरी अशा महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांची ताकद लाभली. लोकसंगीताच्या ठेक्यात रंगलेल्या या प्रयोगाने केवळ मनोरंजन केले नाही, तर काही अस्वस्थ करणारे सवालही प्रेक्षकांसमोर उभे केले

हॅनाची सुटकेस’ला रसिकांचा उदंड प्रतिसाद! 🎭‘जिगीषा नाट्यसहवास’च्या चौथ्या वर्षाची दमदार सुरुवात झाली! ✨रुक्मिणी सभागृह, ए...
22/08/2026

हॅनाची सुटकेस’ला रसिकांचा उदंड प्रतिसाद! 🎭

‘जिगीषा नाट्यसहवास’च्या चौथ्या वर्षाची दमदार सुरुवात झाली! ✨

रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे झालेल्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी ‘हॅनाची सुटकेस’ या संवेदनशील नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

कॅरेन लेव्हिन यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकावर आणि माधुरी पुरंदरे यांच्या मराठी अनुवादावर आधारित या नाटकातून दुसऱ्या महायुद्धातील नाझी अत्याचारांची शोकांतिका आणि ज्यू बालिका हॅना ब्रॅडीची हृदयस्पर्शी कहाणी उलगडते.

दिग्दर्शन : जयेश आपटे | प्रमुख भूमिका : साजिरी जोशी

एका जुन्या सुटकेसभोवती आणि मुलांच्या प्रश्नांभोवती उलगडणाऱ्या या नाट्यकृतीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ❤️

🎭 जिगीषा नाट्यसहवास | नाटक, संवेदना आणि विचारांचा प्रवास!

#जिगीषा #जिगीषानाट्यसहवास #हॅनाचीसुटकेस #मराठीनाटक #नाट्यमहोत्सव रंगभूमी Theatre

Address

Nath Group, Paithan Road
Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathwada Art Culture and Film Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share