Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal

Website Contact the organization

Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal ISO 9001: 2015 Certified NGO. 84 projects, 950 villages, 73 slums.Health, Livelihoods, Environment

 (318)उजाले की बस एक किरण, तू लाकर तो देख…कर सकता है सबकुछ, कोशिश करके तो देख…ऐश्वर्या (नांव बदललेले आहे) छत्रपती संभाजी...
10/10/2026

(318)

उजाले की बस एक किरण, तू लाकर तो देख…
कर सकता है सबकुछ, कोशिश करके तो देख…
ऐश्वर्या (नांव बदललेले आहे) छत्रपती संभाजीनगरच्या एका उपेक्षित वस्तीतील किशोरी. गरीब परिवारातील परंतु अभ्यासू आणि शिकायची खूप इच्छा असलेली.
दहावी पास झाली आणि घरच्यांनी पुढं शिकवण्याऐवजी सरळ तिच्या लग्नाच्या घाट घातला. सोळाव्या वर्षीच!
सुदैवाने ऐश्वर्या सावित्रीबाई फुले मंडळाच्या समर्थ किशोरी प्रकल्पाची विद्यार्थिनी होती. प्रकल्पांच्या समन्वयक ताईंना तिने ताबडतोब फोन केला व सांगितलं, “ताई मला पुढं शिकायचंय… मला लग्न करायचं नाही!”
प्रकल्पाच्या टीमचा तिच्या कुटुंबियांशी चांगला संवाद होता. त्यांनी हरप्रकारे ऐश्वर्याच्या कुचुंबियांची समजूत काढली व त्यांना तिच्या लग्नाचा विचार पुढे ढकलायला लावला. त्यांनी एका अटीवर ते केलं- ‘जर ऐश्वर्या शिक्षणात अपयशी झाली तर मात्र आम्ही तुमचं ऐकणार नाही. तिचं शिक्षण थांबवून लग्न लावून देऊ!”
ऐश्वर्याने दहावी नंतर बारावी व त्यानंतर चार वर्षे फॅशन डिझाईनिंगचं शिक्षण देखील यशस्वीपणे घेतलं. त्यातच करियर करायची आता तिची तयारी सुरु आहे.
बालविवाहाच्या उंबरठ्यावरून ते यशस्वी करियर वुमनपर्यंतचा हा प्रवास दिसतो तेवढा सोपा नव्हता. ऐश्वर्या याचं श्रेय आवर्जून मंडळाच्या समर्थ किशोरी प्रकल्पाला देते.
मायनेक्स फाऊंडेशन च्या सहकार्यानं हा प्रकल्प दरवर्षी ५००० किशोरवयीन मुलींसाठी सकारात्मक काम उभं करत आहे.

Prasanna Patil

 (317)३० सप्टेंबर ची सायंकाळ. दक्षिण मुंबईच्या एका सभागृहात शंभरेक मंडळी एकत्र जमलेली. संख्येने शंभरेक; परंतु समाजजीवनाच...
02/10/2026

(317)

३० सप्टेंबर ची सायंकाळ. दक्षिण मुंबईच्या एका सभागृहात शंभरेक मंडळी एकत्र जमलेली.
संख्येने शंभरेक; परंतु समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी महाराष्ट्रभरातून आलेली ही महत्त्वाची मंडळी होती.
उद्योग- सामाजिक- शिक्षण या क्षेत्रांतील हे मान्यवर मुद्दामहून आले होते ते सावित्रीबाई फुले मंडळावरील स्नेहापोटी! निमित्त होतं- हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये मंडळाची यशोकथा प्रसिद्ध झाल्याचं सेलिब्रेशन!
सुप्रसिद्ध उद्योजक अशोकजी गोयल आणि रविंद्रजी संघवी, मंडळाच्या अध्यक्षा ॲड. प्रियंका बेहरा आणि मंडळाचे पालक डॅा. अनंत पंढरे व्यासपीठावर होते. सावित्रीबाई फुले मंडळाच्या कार्यावर आधारित ‘A journey into the Possible’ या पुस्तकाचं आणि याच नावाच्या डॅाक्युमेंटरी चित्रफितीचं यावेळी प्रकाशन झालं. या यशोकथेचे लेखक हिमांशू वरूडकर यांनी त्यांना मंडळाबद्दल का लिहावं वाटलं? याबद्दल सांगितलं. अशोकजींनी स्वयंसेवी क्षेत्राने व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करून प्रभावी काम कसं करावे याची चर्चा केली. मंडळाच्या सीएसआर भागीदार कंपन्यांचे अधिकारी यांनी मंडळाबद्दल आपले अनुभव सांगितले.
पण सेलिब्रेशन बरोबरच हे सगळं ज्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य होतं, ते सावित्रीबाई फुले मंडळाचे दाते, मार्गदर्शक आणि भागीदार यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान देखील आवश्यक होता. कारण-
अपना क्या है इस जीवन में
सब तो लिया उधार
सारा लोहा उन लोगों का
अपनी केवल धार।
(अरूण कमल)
ही सावित्रीबाई फुले मंडळाची या सगळ्या पाठीराख्यांबद्दल कृतज्ञतेची भावना आहे!
सोबत या चित्रफीतीची लिंक जोडली आहे. आपण आवर्जून आपली प्रतिक्रिया द्यावी.
Link :https://youtu.be/QjGbJgC9V1M

Prasanna Patil

Two important events are happening in Mumbai tomorrow, highlighting SPMESM’s work. While IIT-B event is limited for stud...
29/09/2026

Two important events are happening in Mumbai tomorrow, highlighting SPMESM’s work.
While IIT-B event is limited for students and faculties, you’re most welcome to the evening get together of our well wishers!
Prasanna Patil
Dnyanada Deshpande
Pramod Khambete
Kiran Sabnis

 (316)दाता भुङ्क्ते च नो सर्वं सर्वत्र लभते सुखम्।दातारं न हि सीदन्ति पितरश्च प्रसीदन्ति॥(दान करणारा मनुष्य या जगात सर्व...
25/09/2026

(316)

दाता भुङ्क्ते च नो सर्वं सर्वत्र लभते सुखम्।
दातारं न हि सीदन्ति पितरश्च प्रसीदन्ति॥
(दान करणारा मनुष्य या जगात सर्व प्रकारच्या सुखांचा आनंद घेतो आणि त्याला सर्वत्र सुख मिळते. दान करणाऱ्या व्यक्तीचे पूर्वज कधीही दुःखी होत नाहीत, तर ते अत्यंत प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात)
येत्या काही दिवसांतच पितृपक्ष सुरु होत आहे. या पंधरवाड्यात आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना नमन करण्याची सुंदर प्रथा आहे. आणि हे नमन देखील समाजोपयोगी गोष्टींसाठी दान करून करण्याची परंपराही आहे.
दानामध्येही गरजूंना अन्नदान ही सर्वांत उपयुक्त गोष्ट.
सावित्रीबाई फुले मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील गरजू वृद्धांसाठी देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजना ही घरपोच ताजं भोजन रोज पोहोचवण्याची निःशुल्क सेवा सुरु आहे. यासाठी दरवर्षी ४५ लाख रुपये लागतात.
या उपक्रमाला मदत करून, या पितृपक्षात आपल्या पूर्वजांना नमन करणं ही एक समयोचित गोष्ट ठरेल. नाही का?

 (315)"जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है,परिंदों का कई इम्तिहान अभी बाकी है।अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन हमने,सारा आसमान ...
18/09/2026

(315)

"जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है,
परिंदों का कई इम्तिहान अभी बाकी है।
अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन हमने,
सारा आसमान अभी बाकी है।"
जेंव्हा धाराशिव जिल्ह्यात कौशल्य पारशिक्षणाचे काम आम्ही सुरू केले, त्यावेळी अनेकांनी याचा या छोट्या शहरात महिलांना किती उपयोग होईल अशा शंका व्यक्त केल्या होत्या.
भूम येथील राधिका नितीन घुले यांनी या सगळ्या शंका खोट्या ठरवल्या! भूम येथील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या मदतीने तिथे सुरू असलेले टेलरिंग आणि त्यानंतर आरी वर्क प्रशिक्षण राधिका यांनी पूर्ण केले आणि स्वयंरोजगाराला सुरुवात केली.
आज त्यांचे बुटीक आणि ज्वेलरी शॉप महिलांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
“कौशल्य शिकले, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न साकार झाले!” असं अभिमानाने सांगणाऱ्या राधिका आता इतर महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत.
वात्सल्य ट्रस्ट, मुंबई आणि जय शिवशक्ती हेल्थ एंड एजुकेशन फाउंडेशन, बेंगळूर, यांना या कोर्सेसच्या संचलनात सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद.
Prasanna Patil

 (314) -मराठवाडा सध्या पुन्हा एकदा दुष्काळाच्या छायेत आहे. पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशावेळी जलसाठा उ...
11/09/2026

(314) -
मराठवाडा सध्या पुन्हा एकदा दुष्काळाच्या छायेत आहे. पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अशावेळी जलसाठा उपलब्ध असेल तर सिंचन व्यवस्था होऊन पिके वाचवता येतात. मोठे नुकसान वाचते.
सावित्रीबाई फुले मंडळाने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे जलसाठे पुनरुज्जीवित होऊन अवर्षणातही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळतंय.
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वारेवडगांव चे
विनोद राजेंद्र डिसले हे शेतकरी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगत आहेत.
“मागील काही काळापासून पाण्याच्या कमतरतेमुळे आमच्या शेतीसमोर मोठे आव्हान होते. मात्र, सावित्रीबाई फुले मंडळाने उन्हाळ्यात आमच्या शेताजवळच्या ओढ्याचे खोलीकरण केले. त्यामुळे या पावसाळ्यात जेवढा पाऊस झाला, तेवढ्याने देखील परिसरात भूजलाची पातळी वाढली. आमच्या विहिरीलाही भरपूर पाणी आलं. त्यामुळे माझी केळीची बाग वाचली! ठिबक सिंचनाद्वारे मी बागेला नियमित पाणी देऊ शकत आहे. याशिवाय पाणी असल्याने माझ्या १५ गायींसाठी मुबलक चारा मिळतो आहे आणि मी दूध उत्पादनही चांगलं घेत आहे. जलसंधारणाचं हे काम झाले नसते तर माझी बाग करपून गेली असती!“
वारेवडगांव परिसरात हे काम मंडळाने आणि सेवा इंटरनॅशनल USA यांच्या सहकार्याने पूर्ण केलं आहे.
सिंचनासाठी पाणी ही शेतीप्रधान गावांच्या विकासाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घेऊन मंडळाने आजवर १३२ गावांमध्ये शाश्वत जलस्त्रोत विकासाची कामें पूर्ण केली आहेत.
Sewa International USA

 (313)“कॅार्पोरेट व्हॅालॅंटरिंग- सामाजिक कामात मूल्य आणि आनंदाचीही वृद्धी!”नुकतीच Yeshshree Press Comps Pvt Ltd च्या अधि...
04/09/2026

(313)

“कॅार्पोरेट व्हॅालॅंटरिंग- सामाजिक कामात मूल्य आणि आनंदाचीही वृद्धी!”
नुकतीच Yeshshree Press Comps Pvt Ltd च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले मंडळासह कॅार्पेरेट व्हॅालँटरिंग संकल्पनेला प्रत्यक्षात आणत शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला.
गणेशोत्सव जवळ आलेला असल्याने सगळीकडे प्रदूषण विरहीत मूर्ती घडवण्याची गडबड चालू आहे. प्रदूषणाबद्दल माहिती देतानाच या टीमने शालेय मुलांना नैसर्गिकरित्या उपलब्ध मातीच्या मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण दिले.
त्यातील बारकावे आणि कौशल्य अत्यंत आपुलकीने शिकवले.
मातीचा सुगंध, सर्जनशीलतेचा ध्यास आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधला गेला.

 (312)"There is no chance for the welfare of the world unless the condition of women is improved."- स्वामी विवेकानंदसावि...
28/08/2026

(312)

"There is no chance for the welfare of the world unless the condition of women is improved."
- स्वामी विवेकानंद

सावित्रीबाई फुले मंडळाने स्थापन केलेली चाफा शेतकरी उत्पादक कंपनी ही सगळ्या महिला भागधारक असलेली कंपनी आहे. ग्रामीण शेतकरी महिलांच्या यशस्वी उद्यमशीलतेचे उदाहरण म्हणूनही कंपनी आता ओळखली जाते.
या महिलांनी आणखी एक नवीन स्वप्न पाहीले. ते म्हणजे, दूध प्रक्रिया केंद्र
त्यासाठी या महिलांनी प्रशिक्षण घेतले आणि पुढे FWWB (Friends of Women's World Banking, India) यांच्या मदतीने* दुग्धोत्पादने प्रक्रिया व विक्री सुरु केली. दूध संकलनापासून ते प्रक्रिया आणि पॅकेजिंग पर्यंतची सर्व कामें महिलांच्या करतात.
या केंद्रात तयार होणारे पनीर, खवा, पेढा आणि शुद्ध तूप ही उत्पादने १००% शुद्ध, भेसळमुक्त, लॅब-टेस्टेड आणि प्रमाणित असतात. या कडक गुणवत्ता तपासणीमुळेच त्यांनी तयार केलेली उत्पादने आज थेट मोठ्या शहरांमधील तारांकित हॉटेल्सपर्यंत पोहोचत आहेत.
Prasanna Patil

 Dr Hedgewar Hospital
28/08/2026

Dr Hedgewar Hospital

📢 JOB OPENING – PROJECT DIRECTOR / PROJECT COORDINATOR Organization / NGO Name : Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Ma...
21/08/2026

📢 JOB OPENING – PROJECT DIRECTOR / PROJECT COORDINATOR
Organization / NGO Name : Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal
Department: Public Relations
Designation: Project Director / Project Coordinator
Education: Post Graduation
Experience: 3+ Years
Location: Preferably Chhatrapati Sambhajinagar; Mumbai candidates may also apply
Gender: Preferably Male
Salary: No bar for the right candidate
🔹 Skills Required
• Strong communication and interpersonal skills
• Excellent command of English
• Sound computer knowledge
• Strong networking and relationship-building skills
• Good presentation and stakeholder management skills
🔹 Key Responsibilities
• Meet and develop relationships with new prospective associations
• Connect and coordinate with CSR organizations
• Meet existing and prospective donors
• Build and maintain strong relationships with stakeholders
• Explore new opportunities for partnerships and collaborations
• Represent the organization professionally with external stakeholders

📩 How to Apply
Interested candidates are requested to apply
🌐 Website: www.spmesmandal.org
Email ID : [email protected]
📄 Resume Bank: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfAbJaMMH3u-tzHA9kBt63Q9h8M3UaDVoiezTRsOkQ9ILoasA/viewform?usp=header
Join us and contribute to meaningful social impact!
SPMESM – Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal:

Share