Samaveshak Samajik Vikas Sanstha Aundh Satara western Maharashtra

  • Home
  • India
  • Aundh
  • Samaveshak Samajik Vikas Sanstha Aundh Satara western Maharashtra

Samaveshak Samajik Vikas Sanstha Aundh Satara western Maharashtra Samaveshak social development organizations.

समावेशक संस्था औंध यांच्या वतीने भटके विमुक्त आदिवासी महिलांच्या सोबत 28 में 2026 ( World mainteuation hygiene Day celeb...
29/05/2026

समावेशक संस्था औंध यांच्या वतीने भटके विमुक्त आदिवासी महिलांच्या सोबत 28 में 2026 ( World mainteuation hygiene Day celebration for NTDNT Woman)जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात आला समावेशक महिला लीडर माधुरी जावळे यांनी मासिक पाळी बाबत महिला सोबत चर्चा घडवून आणली.

समावेशक संस्था, औंध  सातारा दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी भुईंज येथे*छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान शिबीर आयोजित...
18/04/2026

समावेशक संस्था, औंध सातारा
दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी भुईंज येथे*छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी समावेशक संस्थेच्या वतीने धनगरवाडी, भिरडाचीवाडी येथील गोपाळ समुदायातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत वाईच्या तहसीलदार सौ. सोनाली मेटकरी मॅडम, आमदार मदनदादा भोसले यांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुरभीताई भोसले, भुईंजचे सरपंच वेळे साहेब तसेच इतर सदस्य यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेदरम्यान संबंधित मान्यवरांनी सांगितले की कलेक्टर साहेबांनी सोलर पॅनल प्रकल्पासाठी विकत घेतलेल्या जागेवर उभारण्यात येणारा सोलर पॅनल प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे गोपाळ समुदायातील नागरिकांना त्या ठिकाणावरून हुसकावून लावण्यात येणार नाही. तसेच ग्रामसेवकांनी संबंधित वस्तीत जाऊन सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, ज्या नागरिकांकडे आधार कार्ड नाही आणि जन्म दाखल्या अभावी त्यांना आधार मिळू शकत नाही, अशा नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून प्रांताधिकारी साहेबांची भेट घेऊन आवश्यक पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासंदर्भात तहसीलदार मेटकरी मॅडम यांनी प्रांताधिकारी यांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.

— समावेशक संस्था, सातारा

संस्था- समावेशक सामाजिक विकास संस्था माध्यमातून दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सातारा तालुक्यातील सोनवडी येथे मतदान कॅम्प आय...
17/04/2026

संस्था- समावेशक सामाजिक विकास संस्था माध्यमातून दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सातारा तालुक्यातील सोनवडी येथे मतदान कॅम्प आयोजित करण्यात आला होता. निवडणूक विभाग गावपातळीवरील कार्यकर्ता BLO मेघना कारंडे मॅडम यांच्या उपस्थितीत गोसावी समुदायातील महिलांचे 25 फॉर्म भरून घेण्यात आले.
सातारा तालुका समन्वयक शिल्पा चव्हाण

Umeed Rural Women entrepreneurs FellowshipUmeed Rural Women entrepreneurs Fellowship Plus Trust in collaboration withSam...
16/04/2026

Umeed Rural Women entrepreneurs Fellowship
Umeed Rural Women entrepreneurs Fellowship Plus Trust
in collaboration with
Samaveshak Samajik Vikas Sanstha
is being implemented in Satara , sangali, Kolhapur district, westrn Maharashtra, under the guidance of Shaila Yadav, Samaveshak organization & Moin Khan Puls Trust to support women and young women from marginalized and underprivileged rural communities.
This six-month fellowship provides financial assistance, mentorship, and strong networking opportunities to help women strengthen their business ideas and move towards sustainable livelihoods.
The core objective of this program is to nurture grassroots women social entrepreneurs by building their confidence, leadership abilities, and economic independence.
The first batch in Satara district has been successfully completed, and the second batch is currently underway. In this cycle, five women have been selected for six months. Through this fellowship, they are strengthening their skills, refining their business ideas, and steadily moving toward economic self-reliance. Importantly, these women are not only building their own capacities but are also supporting and mobilizing other women in their communities, creating a ripple effect of empowerment and collective growth.
Profiles of Selected Fellows:
Dipali Pandhare (Maan Block, Satara District) – Advancing her professional skills in the beauty sector through an advanced beautician course to expand and professionalize her enterprise.
Pooja Lakhe (Kolhapur District) – Running a home-based tailoring business and currently pursuing advanced training in Aari work and fabric painting to diversify her income opportunities. Rohini Madane( Khatav Block satara dist ) – A young woman from a nomadic community who runs mobile study support classes for children of migrant families by visiting their temporary settlements, ensuring access to quality education.Surekha Supne– Engaged in tailoring work and working towards building a stronger entrepreneurial identity.
Varsha Edge – A single woman who is completing her interrupted education while simultaneously working on developing her professional skills and business ideas.
These women were selected not only for their entrepreneurial ideas but also for their resilience, lived experiences, and determination to stand on their own feet. They are emerging as community-level social entrepreneurs with growing confidence and leadership.
In today’s competitive world, rural women’s ideas and innovations are gaining strength and visibility.
The essence of this initiative lies in:
“Becoming self-reliant and enabling others to rise.” With our limited resources, we are continuously striving to strengthen marginalized and excluded women economically and socially.
We invite individuals, institutions, and supporters to join hands with us to expand this initiative and reach more women across rural communities.

14 एप्रिल 2026 रोजी कराड तालुक्यातील कोर्टी गणेशनगर येथे भटक्या विमुक्त  आदिवासी वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ...
14/04/2026

14 एप्रिल 2026 रोजी कराड तालुक्यातील कोर्टी गणेशनगर येथे भटक्या विमुक्त आदिवासी वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

✊ २००३ पासून सुरू असलेला गणेशनगर कोर्टी वस्तीच्या रस्त्यासाठीचा संघर्षकराड तालुक्यातील कोर्टी – गणेशनगर भटक्या वस्तीचे स...
29/03/2026

✊ २००३ पासून सुरू असलेला गणेशनगर कोर्टी वस्तीच्या रस्त्यासाठीचा संघर्ष

कराड तालुक्यातील कोर्टी – गणेशनगर भटक्या वस्तीचे सन २००३ मध्ये पुनर्वसन झाले; मात्र २२ वर्षे उलटूनही गावाशी जोडणारा सुमारे १ ते १.५ कि.मी. रस्ता आजपर्यंत डांबरीकरण झालेला नाही. सुमारे ५६० भटके आदिवासी कुटुंबे येथे वास्तव्यास असून महिला, लहान मुले, विद्यार्थी आणि मजूर दररोज चिखल, धूळ आणि धोकादायक रस्त्यावरून पायी प्रवास करण्यास मजबूर आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत भीषण होते.

पुनर्वसन करताना मूलभूत सुविधा देणे शासनाची जबाबदारी आहे. तरीही गणेशनगर वस्तीला रस्त्यासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब आहे.
या रस्त्याच्या प्रश्नाबाबत समावेशक सामाजिक विकास संस्था सातत्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे.

आज आम्ही छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांची भेट घेतली. स्थानिक महिलांनी स्वतःची व्यथा थेट मांडली. माननीय मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री) यांच्याकडे शिफारस केली आहे. आता प्रत्यक्ष कृतीची आम्ही अपेक्षा ठेवत आहोत.

✊ रस्ता हा आमचा अधिकार आहे — तो मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही.

समावेशक सामाजिक विकास संस्था औंध यांच्या माध्यमातून 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम आज 13 मार्च 2026 र...
13/03/2026

समावेशक सामाजिक विकास संस्था औंध यांच्या माध्यमातून 8मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम आज 13 मार्च 2026 रोजी राजवाडा अश्वमेध वाचनाला हॉल सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, मा. अश्विनी ताई भोसले उपस्थित होत्या. त्यांनी महिलाना आर्थिक व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्षा शैला यादव यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसचालन समावेशक संस्था वाई तालुका समन्वयक सीमा कुडवे यांनी केले

शेवटी आभार. शिल्पा चव्हाण समावेशक संस्था सातारा तालुका समन्वयक यांनी मानले

आजचा कार्यक्रम सर्व गावपातळीवरील महिलांच्या उपस्थित यशस्वी संपन्न झाला.
सर्व महिलांचे आणि प्रमुख मान्यवरांचे मनापासून आभार 🙏

समावेशक संस्था औंध यांच्या माध्यमातून भटक्या विमुक्त आदिवासी गोसावी व मेंढगी जोशी समाजातील   महिला व युवकांना जातीचे दाख...
11/03/2026

समावेशक संस्था औंध यांच्या माध्यमातून भटक्या विमुक्त आदिवासी गोसावी व मेंढगी जोशी समाजातील महिला व युवकांना जातीचे दाखले आधार कार्ड मिळवून देण्यात आले..

समावेशक सामाजिक विकास संस्था औंध यांच्या माध्यमातून आज दिनांक 10 मार्च 2026 पासून सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण ...
10/03/2026

समावेशक सामाजिक विकास संस्था औंध यांच्या माध्यमातून आज दिनांक 10 मार्च 2026 पासून सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 30 गावात भटके विमुक्त आदिवासी महिला व कुटुंब सर्व्हेक्षण संशोधन अभ्यास या विषयी भटक्यांच्या वस्तीवर सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.
सर्व्हेक्षण सुरू करण्या अशी स्थानिक ग्रापंचायत यांना विषय समजून सांगून सर्वेक्षणासाठी परवानगी व सहकार्य मिळणे बाबत पत्र देण्यात आले.
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क कॉलेजचे विद्यार्थी व समावेशक संस्था टीम या सर्व्हेक्षण अभ्यास संशोधन मध्ये मदत करत आहेत.

आज दिनाक 27/2/26 रोजी हातकणंगले मतदार संघ .खासदार धैर्यशील  माने साहेब यांना भटके विमुक्त आदिवासी संयोजक समितीच्या वतीने...
27/02/2026

आज दिनाक 27/2/26 रोजी हातकणंगले मतदार संघ .खासदार धैर्यशील माने साहेब यांना भटके विमुक्त आदिवासी संयोजक समितीच्या वतीने जनगणना फॉर्म मध्ये NT.VJNT ची अधिकृत सूची नोंद करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले
तसेच खासदार साहेब म्हणले खूप महत्वाचा मुद्दा आपण घेतला आहे हा मुद्दा नक्कीच संसद मध्ये उपस्थित करेन असे आश्वासन दिले निवेदन देताना .समावेशक सामाजिक विकास संस्था चे सचिव रमेश जावळे राहुल मोरे.युवराज लाखे .आणि इतर सर्व कार्यकर्ते.

Address

Ganeshwadi Rood
Aundh
415510

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samaveshak Samajik Vikas Sanstha Aundh Satara western Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samaveshak Samajik Vikas Sanstha Aundh Satara western Maharashtra:

Share