Rotary Club Of Akluj

Rotary Club Of Akluj This is the official page of Rotary Club Of Akluj.Join Us.

*मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत  रक्त तपासणी शिबिर कॅम्प 3*दृष्टी ही आपल्या जीवनातील अमूल्य संपत...
15/03/2026

*मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत रक्त तपासणी शिबिर कॅम्प 3*

दृष्टी ही आपल्या जीवनातील अमूल्य संपत्ती आहे. डोळ्यांच्या आरोग्याची योग्य वेळी काळजी घेतल्यास अनेक नेत्रविकार टाळता येतात आणि मोतीबिंदूसारख्या आजारांचे लवकर निदान करून दृष्टी सुरक्षित ठेवता येते.
या उद्देशाने *ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरीज लि., श्रीपूर* यांच्या सहकार्याने *रोटरी क्लब अकलूज व एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, मोहम्मदवाडी*, पुणे यांच्या मार्फत
*👁️ मोफत नेत्र तपासणी*
*👁️ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया*
*🩸 मोफत रक्त तपासणी*
असे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

*📅 मंगळवार, दिनांक 17 मार्च 2026*
*⏰ सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत*
*📍 ठिकाण : ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरीज लि., श्रीपूर*
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची सखोल तपासणी करून गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*तपासणीदरम्यान ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळून येईल, त्यांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधवार दिनांक 25 मार्च 2026* रोजी करण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रकल्प प्रमुख : रो. संदीप लोणकर
संचालक : रो. डॉ. अभिजीत मगर
सचिव : रो. अजिंक्य जाधव
अध्यक्ष : रो. केतन बोरावके

आयोजक : रोटरी क्लब अकलूज

*“शांतता आणि संघर्ष प्रतिबंध व निराकरण” या महिन्याचे औचित्य साधून  मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली* शांतता आणि संघर्ष प्रत...
28/02/2026

*“शांतता आणि संघर्ष प्रतिबंध व निराकरण” या महिन्याचे औचित्य साधून मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली*

शांतता आणि संघर्ष प्रतिबंध व निराकरण या विषयाच्या अनुषंगाने *रोटरी क्लब अकलूज, श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अकलूज आणि शिवरत्न संस्था अकलूज* यांच्या संयुक्त विद्यमाने नॉलेज सिटी, अकलूज येथील महाविद्यालयांमध्ये *मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली* या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन *रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर मा.रो श्री. यशवंत हांडे साहेब* यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी “जागतिक शांतता” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर *ग्रीन फिंगर्स कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी अकलूज, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अकलूज आणि विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, शंकरनगर अकलूज येथील एकूण 48 विद्यार्थ्यांनी भारत, अमेरिका, चीन, इराण, फ्रान्स, जर्मनी, युक्रेन आणि रशिया* या देशांचे प्रतिनिधित्व करत पारंपरिक पेहरावात प्रभावी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी विविध देशांची भूमिका मांडत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्ष, मुत्सद्देगिरी, संवाद व शांततेचे महत्त्व यावर सखोल चर्चा केली.
मॉडेल युनायटेड नेशन्स असेंबली हा केवळ वादविवादाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित होतो.
जागतिक घडामोडींबाबत सखोल ज्ञान व विश्लेषण क्षमता वाढते.
विविध देशांच्या भूमिका समजून घेताना सहिष्णुता व जागतिक बंधुत्वाची भावना दृढ होते.
कलागुण, सादरीकरण कौशल्य आणि तार्किक विचारसरणीला योग्य वाव मिळतो.
रोटरी क्लब अकलूजचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्ट्या नव्हे तर जागतिक नागरिक म्हणून घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
याशिवाय 210 हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या शैक्षणिक आणि बौद्धिक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, सहसचिव कल्पेश पांढरे, प्रकल्प प्रमुख गजानन जवंजाळ तसेच सदस्य अजित वीर आणि जयदीप बोरावके यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा प्रस्तुत 🌟*रोटरी क्लब अकलूज, मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र*आणि*अकलूज स्त्री रोग तज्ञ संघटना...
11/12/2025

मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा प्रस्तुत 🌟
*रोटरी क्लब अकलूज, मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र*
आणि
*अकलूज स्त्री रोग तज्ञ संघटना* यांच्या संयुक्त विद्यमाने

✨ “शुद्ध, सतेज व सुसंस्कारी पिढीसाठी – वैज्ञानिक गर्भसंस्कार” ✨
हा प्रबोधनात्मक आणि उपयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे.

*📅 रविवार, दिनांक 21 डिसेंबर 2025*
*⏰ सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत*
*📍 स्मृतिभुवन, शंकर नगर, अकलूज*

🧠 भावी पिढी घडविण्यासाठी आधुनिक विज्ञान, संस्कार आणि आरोग्य यांची सांगड घालणारा हा उपक्रम
🤰 माता-पित्यांना गर्भातूनच संस्कार देण्याचे तंत्र आणि मोलाची माहिती
👨‍⚕️ अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन

आपण सर्वांनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा, ही विनंती.
सुसंस्कारी भवितव्य घडविण्याचा संकल्प आजच! 🌿
सोबत नोंदणी करण्यासाठी लिंक पाठवत आहे या लिंक वर नोंदणी करावी👇

https://forms.gle/kkW4vSsAnyLmdTBb9

*रो.ॲड.प्रवीण कारंडे प्रकल्प प्रमुख*
9922239906
*रो डॉ अभिजीत मगर संचालक*
9923238529
*रो अजिंक्य जाधव सचिव*
9970332288
*रो केतन बोरावके अध्यक्ष*
9921404346

*रोटरी क्लब अकलूज*

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पिंग हँड्स’ उपक्रमअकलूज (प्रतिनिधी):*रोटरी क्लब अकलूज आणि धनशैल्य विद्यालय, गिरझणी व कि...
05/11/2025

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पिंग हँड्स’ उपक्रम

अकलूज (प्रतिनिधी):
*रोटरी क्लब अकलूज आणि धनशैल्य विद्यालय, गिरझणी व किडझी अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेल्पिंग हँड्स’* हा अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

गेल्या महिन्यात जिल्ह्यातील अनेक भागांना पूराचा फटका बसला होता. त्यात *तिऱ्हे (ता. सोलापूर), घोडके वस्ती, शिंगोळी, पीरटाकळी आणि तरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील एकूण १८३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले*. या किटमध्ये वह्या, स्टेशनरी, स्कूल बॅग, एक ड्रेस, हँडवॉश, कलर सेट आदी वस्तूंचा समावेश होता.

या साहित्याचे संकलन धनशैल्य विद्यालय गिरझणी व किडझी अकलूज येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘हेल्पिंग हँड्स’ या विशेष उपक्रमांतर्गत केले होते. बालचिमुकल्यांनी स्वतःच्या छोट्याशा दानातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठी मदत केली असून त्यांच्या संवेदनशीलतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संस्थेच्या सर्व शिक्षकांनी पालकांनी या कार्यक्रमासाठी सर्वोपरी प्रयत्न केले.

पूरग्रस्त शाळांची निवड सोलापूर दूध उत्पादक संघाचे व्हाइस चेअरमन मा. श्री. दीपक माळी यांच्या सहकार्याने करण्यात आली. त्यांनी या संपूर्ण उपक्रमात मोलाची साथ दिली.

वितरण प्रसंगी धनशैल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मनिष गायकवाड म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे. अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता विकसित होते.”

या कार्यक्रमाला रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो. केतन बोरावके,रोटरी क्लब अकलूजचे संचालक आणि धनशैल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मनीष गायकवाड सर ,संचालक रो अभिषेक टेके व सदस्य रो याबाजी सर तसेच धनशैल्य शिक्षण संस्थेचे संचालक रविकिरण फडे, विनायक सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी अशा सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत आयोजक संस्थांचे आभार मानले आणि अशा दुर्लक्षित शाळांकडे लक्ष दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

*गौरी गणपती सजावट स्पर्धा :- 2025*रोटरी क्लब ऑफ अकलूज*आयोजित...*पर्यावरणपूरक गौरी गणपती सजावट स्पर्धा :- 2025*खास गौरी ग...
01/09/2025

*गौरी गणपती सजावट स्पर्धा :- 2025
*रोटरी क्लब ऑफ अकलूज*
आयोजित...

*पर्यावरणपूरक गौरी गणपती सजावट स्पर्धा :- 2025*
खास गौरी गणपती सणानिमित्त एक स्पर्धा आयोजित करीत आहोत. तरी आपण त्यात सहभाग नोंदवून आपली कलाकृती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावी.

*नियम:-*
1. व्हिडिओ कमीत कमी एक मिनिट व जास्तीत जास्त दीड मिनिटांचा असावा. त्यापेक्षा मोठा व्हिडिओ स्वीकारला जाणार नाही.
2. व्हिडिओ काढताना मोबाईल (कॅमेरा) आडवा धरून काढावा. (उभा मोबाईल धरून काढलेला व्हिडिओ बाद धरण्यात येईल)
3. व्हिडिओ बरोबर आरास चा एक जिओ टॅग फोटो पाठवावा लागेल, बरोबर दिलेल्या लिंक वर जाऊन जिओ टॅग अँप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून आपण फोटो पाठवू शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.gpsmapcamera.geotagginglocationonphoto
4. स्पर्धकांनी आरासाची त्यात थोडक्यात माहिती सांगावी. यामध्ये *सामाजिक, पर्यावरण, कृषी, आरक्षण, शैक्षणिक, हुंडाबळी* इत्यादी असे सामाजिक विषयांवरील संदेश असावेत.
5. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
6. प्रथम तीन विजेत्यांना विशेष गिफ्ट व प्रमाणपत्र तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
7. आपले व्हिडिओ वार शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 सायं 5 वाजेपर्यंत या नंबर वरती 9763215622 या व्हाट्सउप वरती पाठवावेत त्या सोबत आपला पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा.
8. पर्यवेक्षक, प्रकल्प प्रमुख आणि संचालक सदस्यांना जे व्हिडिओ निवडले जातील त्यातील पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल, तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
9. व्हिडिओ मध्ये कोणताही ऑडिओ/ गाणे टाकू नका टाकला तर तो व्हिडिओ बाद करण्यात येईल

*आपले विनीत*💐
रो. सौ. प्रिया नागणे ,रो. सौ. तृप्ती कुदळे ,रो.आशा शेख ,रो. सौ. तेजस्विनी बोरावके -प्रकल्प प्रमुख

रो. संदीप साळुंखे - संचालक
रो. अजिंक्य जाधव - सचिव
रो. केतन बोरावके- अध्यक्ष

व सर्व सदस्य रोटरी क्लब अकलूज

अधिक माहिती साठी संपर्क -
रो. केतन बोरावके 9921404346
रो. अजिंक्य जाधव 9970332288

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष आरोग्य उपक्रम 🍼🌍स्थळ: उपजिल्हा रुग्णालय, अकलूजसंयोजन: रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि स्त्री...
06/08/2025

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष आरोग्य उपक्रम 🍼🌍
स्थळ: उपजिल्हा रुग्णालय, अकलूज
संयोजन: रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने
मातृत्वाच्या या पवित्र प्रवासात आरोग्यदायी पावले उचलत, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त एक आगळावेगळा व समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भवती महिलांमध्ये स्तनपानाबाबत जागरूकता वाढवणे, त्यांच्या मनातील शंका दूर करणे आणि पोषणविषयक योग्य माहिती पुरवणे.

👩‍⚕️ स्तनपानाचे शारीरिक व मानसिक फायदे, बालकाच्या विकासामधील महत्त्व, आणि मातेसाठी होणारे आरोग्य लाभ यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मातांना स्तनपानासंदर्भातील वैज्ञानिक माहिती, योग्य पद्धती आणि होणाऱ्या अडचणी यावर समजूतदारपणे संवाद साधण्यात आला. या आरोग्य उपक्रमाअंतर्गत मोफत पोषक आहाराचे वाटप देखील करण्यात आले, जे मातांच्या आरोग्य संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. एकूण ११० गर्भवती मातांनी या उपक्रमात सहभाग घेत, त्यांना सशक्त मातृत्वासाठी आवश्यक अशी प्रेरणा आणि माहिती मिळाली.या या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो केतन बोरावके सचिव रो अजिंक्य जाधव , संचालक रो तृप्ती कुदळे सदस्य तेजस्विनी बोरावके आणि रो कल्पेश पांढरे या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली

🔥 "एक शिक्षक बदलतो… तर संपूर्ण पिढी घडते!" 🔥🎓 रोटरी क्लब अकलूज मार्फत ✨ ZP शिक्षकांसाठी परिवर्तनशील प्रशिक्षण शिबिर! ✨शि...
06/08/2025

🔥 "एक शिक्षक बदलतो… तर संपूर्ण पिढी घडते!" 🔥
🎓 रोटरी क्लब अकलूज मार्फत ✨ ZP शिक्षकांसाठी परिवर्तनशील प्रशिक्षण शिबिर! ✨

शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्याच्या हेतूने,
रोटरी क्लब अकलूज यांनी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले, ज्यात 120 हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिबिराची ऊर्जा द्विगुणीत केली!

🔶 या शिबिराचे विशेष आकर्षण – गिरीश कोनकर सर
▪ भारतीय नौदलाच्या पाणबुडीचे माजी कमांडिंग ऑफिसर
▪ नेतृत्व, मूल्यशिक्षण व प्रेरणादायी मार्गदर्शनातील राष्ट्रीय स्तरावरील वक्ते

यांनी आपल्या अमूल्य अनुभवातून शिक्षकांना नेतृत्व, उद्दिष्ट, टीम बिल्डिंग आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे झळाळते दिशादर्शन दिले. त्यांचे प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द शिक्षकांच्या मनात नवी उमेद जागवून गेला!

📌 हे प्रशिक्षण शिबिर म्हणजे केवळ एक उपक्रम नव्हे,
तर भावी पिढ्यांच्या उभारणीसाठी रोवलेली प्रेरणेची बीजे होती.

🙌 रोटरी क्लब अकलूज यांचा विश्वास —
"शिक्षक परिवर्तनाचे अग्रदूत असतात, आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत!"

💠 सेवा हीच संस्कृती | शिक्षण हेच सामर्थ्य | रोटरी हेच माध्यम 💠

रोटरी क्लब ऑफ अकलूजने दत्तनगर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते आणि या नेत्...
24/07/2025

रोटरी क्लब ऑफ अकलूजने दत्तनगर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते आणि या नेत्र तपासणी शिबिरामध्ये १२५ विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली . या प्रकल्पासाठी अभिजित हॉस्पिटलच्या डॉ. प्रज्ञा अभिजित गांधी यांनी या शिबिरासाठी मोफत सेवा दिल्या.
या प्रकल्पासाठी रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष रो केतन बोरावके,सचिव रो अजिंक्य जाधव, सहसचिव रो कल्पेश पांढरे,प्रकल्प प्रमुख रो डॉ अभिजीत गांधी,रो डॉ अभिजीत मगर आणि रोटरी क्लब अकलूजचे सदस्य उपस्थित होते.

27/03/2025

👉 रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रम!

📢 गरोदर दाम्पत्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर! 👶🏻

🎯 गर्भाचे भाव-विष्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार

📅 रविवार, ६ एप्रिल २०२५ (रामनवमी)
⏰ सकाळी १० ते दु. १ (अल्पोपहारासह)
📍 स्मृती भवन, शंकर नगर, अकलूज
💰 विनामूल्य कार्यक्रम

🤰 गर्भसंस्कार म्हणजे काय? ते कसे करावे?
🎵 गर्भसंस्कारात प्रार्थना, संगीत, गोष्टी यांचा समावेश
🔬 स्ट्रॉबोस्कोप चाचणी आणि उपाय

🌟 पूर्व नोंदणी आवश्यक! प्रत्येक जोडप्याला ‘मनशक्ती संस्कार साहित्य’ भेट मिळेल.

📌 नोंदणीसाठी Google फॉर्म भरा:

https://forms.gle/GjVML7qBjxpGLL4s6

👉

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
➡️ - रो. ॲड. प्रविण कारंडे 9922239906
➡️ - रो. नवनाथ नागणे 9322049999
➡️ - रो. गजानन जवंजाळ 9423327903
➡️ - रो. मनिष गायकवाड 9096166514
➡️ - रो. केतन बोरावके 9921404346
➡️ - रो. सौ. प्रिया नागणे 9860891616

Address

Akluj
Akluj
413101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club Of Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rotary Club Of Akluj:

Share