29/10/2025
https://www.facebook.com/share/r/17YNHjG4k1/
हे दुःख का संपत नाही.....
एक दिवस आड करून दोन आजोबांचा मृत्यू झाला.या सर्व दुःखातुन सावरून आम्हाला आहे त्यांची जबाबदारी सुद्धा पार पडायची असते.जन्म दिलेल्या पोटच्या पोराबाळांना आईवडीलांच्या मृत्यूच दुःख आयुष्यात एकदाच भोगाव लागत पण इथे मला आणि अनुला हे रोजच भोगायच आहे.अहो एखादा कुत्रा पाळला तर एक दोन दिवसात त्याचा लळा लागतो,ही तर मानस आहेत आम्ही त्यांना आपलं मानून सांभाळतो आमचा एकमेकांना जीव लागलेला असतो आणि ती अशी निघून जातात जेव्हा वाईट वाटतं.
समाजाला,लोकांना दिसताना हे काम फार छान वाटतं पण हे सर्व अडथळे, दुःख,ताणतणाव,मानसिक त्रास,भौतिक,शारीरिक,सामाजिक,आर्थिक अडचणी यांचा ही विचार करायला हवा.चुकून एखादी गोष्ट आमच्याकडून थोडी मागेपुढे झाली की काही लोक आमच्यावर नाराज होतात पण एकटा मुलगा हे सर्व कसं सहन करत असेल, कसा हा सर्व डोलारा चालवत असेल कित्येक अडचणींचा सामना करत असेल याचा ही या निमित्ताने विचार होणे गरजेच आहे.कित्येकदा भरलेल्या तटावरून उठाव लागत.स्वतःचा सुख दुःख, दुखणं,आजारावण सर्व बाजूला ठेवावं लागतं.असो हा आपला आजचा विषय नाही पण भावनेच्या भरात बोलून गेलो.
माझा शेवट हा पंढरपूर मध्ये व्हावा अशी आजोबांची शेवटची इच्छा होती आणि त्यांच्या लेकीने ती पूर्ण केली.एकीकडे आठ मुली असून सुद्धा आईच्या अंत्यविधी करायला कुणीही तयार झाल नाही उलट एकमेकींच्या मध्ये भांडण सुरू झालं,तर एकीकडे मोलमजुरी करून जगणाऱ्या मुलीने वडिलांचे अंत्यविधी करणे स्वीकारले....
कला आश्रमातील कुलकर्णी आजोबांना वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. मुलगा नव्हता एकुलती एक मुलगी.आयुष्यभर मोलमजुरी करून जगले,रहायला स्वतःच घर नाही, कष्ट करून मुलीचं लग्न पंढरपूर मध्ये लावून दिल.नवरा वडिलांना सांभाळून देत नाही म्हणून नाईलाजाने आपल्या मोरवंची येथील वृद्धाश्रमात सोडले होते.मध्यंतरीच्या काळात आजोबा बराच वेळ आजारी होते,मी आणि अनुने जेवढी करता आली तेवढी सेवा मनोभावे केली पण काल त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला खरंतर आतापर्यंत पाच-पन्नास मयत आपण केल्या पण आश्रमामधून बाहेर जाणारी ही दुसरीच मयत.एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाल्यावर नातेवाईकांना कित्येकवेळा फोन करावे लागतात,कोणीही नातेवाईक यायला तयार नसतात अंत्यविधी करणे तर दूरचीच गोष्ट. पण ही कष्ट करून जगणारी मुलगी,वडील वारले असा फोन केल्या केल्या टाहो फोडत आली.व्हिडिओ एकदा आवर्जून पहा म्हणजे तिचा आक्रोश तुम्हाला जाणवेल. तिने आजोबांच्या अंत्यविधी करायची तयारी दर्शवली. मग आम्ही ॲम्बुलन्सची व्यवस्था केली आणि पंढरपूरला